लवासाला नोटीस का पाठवली – पवार

November 30, 2010 9:18 AM0 commentsViews: 3

30 नोव्हेंबर

लवासाला पर्यावरण मंत्र्यालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. लवासा प्रकरणी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आपलं मौन सोडलं. त्यांचा रोख होता पर्यावऱण मंत्रालयावर लवासात 1600 घरे विकली गेलीत, कामही सुरु आहे. मग आता नोटीस का पाठवली असा सवाल पवार यांनी केला. नोटीस बजावण्याअगोदर आमचं मत लक्षात घ्यायला हवं होतं. असंही पवार म्हणाले.

लवासाला नोटीस दिल्याप्रकरणी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांच्यावर तोफ डागली. लवासाला कारणे दाखवा नोटीस देण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करायला हवी होती असं पवार यांनी म्हटलं. दरम्यान 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्या-प्रकरणी सरकारनं कार्पोरेट कंपन्यांवरची कारवाई थांबवायला हवी असं राष्ट्रवादीचं मत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारवाईच्या बडग्यामुळे कंपन्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होईल असं मत यूपीए तल्या अनेक घटकपक्षांचे आहे. सध्या झालेला तपास पुरेसा असल्याचं या पक्षांना वाटतं.

लवासातली 1600 घरं विकली गेली आहेत. तिथं कामसुद्धा सुरू आहे. नोटीस पाठवण्यापूर्वी आमचे मत विचारात घ्यायला हवं होतं. लवासाला नोटीस का पाठवली हे मला समजत नाही.

येत्या पंधरा दिवसात या नोटीसाला लवासानंनं उत्तर दिलं नाही तर काम त्यांचं काम थांबवण्याचा इशारा पर्यावरण मंत्र्यालयानं दिली होता. 25000 हजार एकरावर पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेल्या या प्रकल्पाच्या संदर्भात पर्यावरण संरक्षणाबाबत पर्यावरण खात्यानं चौकशी सुरु केली असल्याची माहिती सुत्रांनी आयबीएन लोकमतला दिली आहे. समुद्र सपाटीवरुन 1000 मिटरच्या उंचीवर कुठल्याही ठिकाणी बांधकामासाठी पर्यावरण खात्याची परवानगी घ्यावी लागते.

पर्यावरण खात्याकडे लवासाने अशी परवानगी घेतली नसल्याची तक्रार आली होती. तक्रारीत लवासाचे प्रवेशद्वार हे समुद्र सपाटीसाठी पासून 1052 मिटरच्या उंचीवरअसल्याच सांगण्यात आलं होत.

close