कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी आणखी दोघांवर कारवाई

November 30, 2010 9:42 AM0 commentsViews: 5

30 नोव्हेंबर

कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा प्रकरणी सीबीआयनं कॉमनवेल्थ गेम्सचे संयोजन समितीचे माजी संचालक आर.के. संचेती यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. सीबीआयनं 11 जागी छापे टाकले यात ललित भानोत आणि वर्मा यांचाही निवासस्थानाचा समावेश आहे. सीबीआयनं टाईम स्कोअरींग बोर्ड खरेदीत अपहार प्रकरणात कलमाडी यांचे सहकारी व्ही.के. वर्मा आणि ललित भानोत यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यात 107 कोटींचा अपहार झाल्याचा सीबीआयला संशय आहे. तसेच पण आपला याच्याशी संबंध नसल्याचं व्ही के वर्मा यांनी म्हटले आहे.

close