केंद्रीय दक्षता आयोगाचे आयुक्त पी.जे. थॉमस राजीनामा देण्याची शक्यता

November 30, 2010 9:52 AM0 commentsViews: 6

30 नोव्हेंबर

केंद्रीय दक्षता आयोगाचे आयुक्त पी जे थॉमस पायउतार होण्याची शक्यता आहे.थॉमस यांनी राजीनामा द्यावा यासाठी गृहमंत्रालयाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. थॉमस यांनी काल गृहमंत्री पी चिंदबरम यांची भेट घेतली. थॉमस यांच्या नियुक्तीवर सुप्रीम कोर्टानं आक्षेप घेतला होता. भ्रष्टाचाराचे आरोप असतांना थॉमस यांची केंद्रीय दक्षता आयोगाच्या आयुक्तपदी निवड झालीचं कशी असा सवाल सुप्रीम कोर्टानं केला होता. थॉमस यांच्यावर पाम तेल घोटाळा आणि 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी आरोप आहेत.भाजपनंही त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतले होते.

close