सरकारच्या चहापानावर बहिष्कार

November 30, 2010 10:36 AM0 commentsViews: 1

30 नोव्हेंबर

नागपूरात उद्यापासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं आहे. त्यानिमित्तानं सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्षांची बैठक झाली. त्यात शिवसेना, भाजप, मनसे आणि शेकापचे नेते सहभागी झाले होते. सरकार घोटाळेबाज आहे अशा सरकारबरोबर चहापान करणार नाही असा निर्णय विरोधकांनी घेतला. वाढता भ्रष्टाचार, शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्यात सरकार अपयशी झाल्याचा आरोप विरोधकांनी केला.

close