विधानपरिषदेच्या दोन जागांचे निकाल जाहीर

November 30, 2010 10:51 AM0 commentsViews: 3

30 नोव्हेंबर

विधानपरिषदेच्या दोन जागांचे निकाल जाहीर झाले. भंडारा – गोंदिया मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र जैन विजयी झाले. त्यांनी संदीप गवईंचा पराभव केला.जैन यांना 164 मतं मिळाली. तर संदीप गवई यांना 88 मते मिळाली. संदीप गवई हे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. तर यवतमाळमध्येही राष्ट्रवादीचे संदीप बाजोरिया विजयी झाले आहेत. बाजेरीया 198 मतांनी विजयी. त्यांच्या विरोधात असलेल्या अपक्ष दीपक निलावार यांना 48 मतं तर किसन बोरले यांना फक्त 1 मत मिळालं.

close