अण्णा हजारेंचं उपोषण लांबणीवर

November 30, 2010 11:18 AM0 commentsViews: 2

30 नोव्हेंबर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी उपोषण लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. लवासा प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांच्या चौकशीचा आयोग नेमावा आणि अवैध टोलवसुलीबाबत सरकारनं निर्णय घ्यावा या अण्णांच्या प्रमुख मागण्या आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. अण्णांनी सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. आपल्या मागण्यांवर पावलं उचलील नाहीत तर पुन्हा उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे. या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री ही उपस्थित होते.

close