नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादकांच्या आत्महत्येचं सत्र सुरू

November 30, 2010 11:39 AM0 commentsViews: 3

30 नोव्हेंबर

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादकांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. दिंडोरी तालुक्यातल्या खेडगावमध्ये किरण रणदिवे या तरुण शेतकर्‍यानं आत्महत्या केली. गेल्या दहा दिवसातली नाशिक जिल्ह्यातली ही तिसरी आत्महत्या आहे. पावसामुळे वाढलेल्या कर्जाच्या बोजानं द्राक्ष उत्पादक आत्महत्या करत असल्याची त्यांच्या कुटुंबियांची तक्रार आहे. कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कुटुंबांची भेट घेऊन आत्महत्या न करण्याचं आवाहन शेतकर्‍यांना केलं. मात्र 10-12 लाख रुपयांच्या कर्जाची फेड अशक्य झाल्यानं हे सत्र सुरूच आहे. व्याजदरात किंवा कर्जफेडीत सवलत मिळावी अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

close