जागतिक वकील परिषदेला उज्ज्वल निकम उपस्थित

November 30, 2010 11:54 AM0 commentsViews: 8

30 नोव्हेंबर

संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जगभरातील सरकारी वकीलांची परिषद 1 ते 3 डिसेंबरला न्युयॉर्क इथं आयोजित करण्यात आली आहे. जवळपास 25 राष्ट्रांचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. यामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम हे भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहेत. न्युयॉर्कमध्ये त्यांनी आयबीएन लोकमतशी बातचीत केली. यात दहशतवादांच्या लढाईत अडचणी काय आहेत यात दहशतवादविरोधी कायद्यामध्ये काय सुसुत्रता असावी. आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचा सहभाग वाढायला हवा यावर त्यांनी विचार व्यक्त केले.

close