आयसीसीच्या नवीन टेस्ट क्रमवारीत सचिन दूसर्‍या स्थानावर

November 30, 2010 12:04 PM0 commentsViews: 1

30 नोव्हेंबर

आयसीसीची नवीन टेस्ट क्रमवारी जाहीर झाली. आणि बॅट्समनच्या यादीत सचिन तेंडुलकरला श्रीलंकेच्या कुमार संगकाराने मागे टाकलं आहे. तेंडुलकर आता दुसर्‍या स्थानावर आहे. आणि संगकारापेक्षा तीन पॉइंट्सनी मागे आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये सचिनची कामगिरी साधारण होती. आणि चार इनिंगमध्ये त्याने फक्त 126 रन केले. याउलट संगकाराने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या टेस्टमध्ये 150 रन करुन आपला फॉर्म सिद्ध केला. बॉलर्सच्या यादीत मात्र भारताच्या झहीर खानने तिसर्‍या स्थानावर झेप घेतली. झहीरचं हे सर्वोत्तम रँकिंग आहे.

close