पार्किंग लॉटच्या नावाखाली 25 हजार कोटीचा घोटाळा

November 30, 2010 12:19 PM0 commentsViews: 5

30 नोव्हेंबर

आदर्श घोटाळ्यानंतर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यकाळात आणखी एक घोटाळा झाल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी वाय.पी.सिंग यांनी केला. मुंबईत पार्किंग लॉटच्या नावाखाली 20-25 हजार कोटींचा घोटाळा झाला असं माजी आयपीएस अधिकारी वाय.पी.सिंग यांचं म्हणणं आहे. तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अख्त्यारितल्या नगरविकास विभागानं डोळे झाकून मुंबईतल्या काही बड्या बिल्डरांनी पार्किंग लॉटच्या नावाखाली मोठ्याप्रमाणात एफएसआय दिल्याचा वाय.पी.सिंग यांचा आरोप आहे. तसेच अशी बांधकाम करताना पर्यावरण विषयक नियमांचे उल्लंघन झाल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळानंही या बिल्डर्सना नोटीस पाठवल्यायत असा दावा वाय.पी.सिंग यांनी केला आहे.

close