सुप्रीम कोर्टाचा येडियुरप्पांना धक्का

November 30, 2010 12:31 PM0 commentsViews: 1

30 नोव्हेंबर

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना सध्या भाजपनं दिलासा दिला असला तरी आता सुप्रीम कोर्टानं येडियुरप्पांना धक्का दिला. सात बंडखोर आमदारांचे निलंबन रद्द केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने येडियुरप्पा आणि कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांना नोटीस बजावली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाला या सात आमदारांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं. पण हायकोर्टानं हा निर्णय योग्य असल्याचा निर्णय दिला होता. पण आता सुप्रीम कोर्टानं याप्रकरणी मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना नोटीस पाठवली आहे.

close