तांत्रिक भोंदू बाबाकडून लाखो रुपयांची रोकड जप्त

November 30, 2010 12:44 PM0 commentsViews: 2

30 नोव्हेंबर

मुंबई पोलिसांनी काल (सोमवारी) अटक केलेल्या तांत्रिक भोंदू बाबाकडून लाखो रुपयांची रोकड, हिरे आणि सोनं जप्त करण्यात आले आहे. या तांत्रिकाने जादूटोण्याच्या नावाखाली चार मुलींवर बलात्कार केले. नझीम असं या तांत्रिकाचे नाव आहे. हा तांत्रिक आपल्या तंत्रविद्येने मुल न होणार्‍या स्त्रियांनाही मुल होईल असा दावा करायचा. जे जे मार्ग पोलिसांनी या तांत्रिकाला काल अटक के ली. कोर्टाने 3 डिसेंबरपर्यत तांत्रिकाला पोलिस कोठडी सुनावली आहे.

close