‘लवासा’ची हायकोर्टात धाव

November 30, 2010 5:06 PM0 commentsViews: 17

30 नोव्हेंबर

लवासा सिटीवरून लवासा कॉर्पोरेशन आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. आता लवासानं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. पर्यावरण संरक्षण कायदा आणि वन संवर्धन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी लवासाला शो कॉज नोटीस पाठवली आहे. याला उत्तर देण्यासाठी लवासाला 15 दिवसांची मुदत देण्यात आली. पण आता लवासानं कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

close