सृष्टी फिल्मचं शानदार लाँचिंग

November 30, 2010 5:43 PM0 commentsViews: 2

30 नोव्हेंबर

मराठी सिनेसृष्टीत आता आणखी एक नवं प्रॉडक्शन हाऊस दाखल झालं आहे. लीना बाळ नांदगावकर यांची सृष्टी फिल्मस ही चित्रपट निर्मिती संस्था नुकतीच लॉन्च करण्यात आली. या संस्थेतर्फे निर्मिती होत असलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणाही यावेळी करण्यता आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या संस्थेचं उदघाटन करण्यात आलं. अभिनेते नाना पाटेकर, अभिनेता – दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या सह चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

close