बल्क एसएमएसना बसणार आळा

December 1, 2010 11:25 AM0 commentsViews: 4

01 डिसेंबर

मोबाईल धारकांसाठी एक चांगली बातमी आहे. ट्रायच्या नव्या गाईडलाइन्सनुसार मोबाईल ग्राहकांना आता व्यावसायिक कॉल आणि बल्क एसएमएस यांना आळा घालता येणार आहे. 1 जानेवारी 2011 पासून ग्राहक या सेवेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये ग्राहकांना व्यावसायिक कॉल्स आणि बल्क एसएमएस थांबवण्यासाठी 'डू नॉट कॉल' चा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. ग्राहकांनी कळवल्यानंतर 7 दिवसात त्यांना ही सेवा उपलब्ध करून देणं नेटवर्क प्रोव्हायडर्सना बंधनकारक राहील.

close