विदर्भ संग्राम समितीच्या विदर्भ बंदला अत्यल्प प्रतिसाद

December 1, 2010 12:44 PM0 commentsViews: 4

01 डिसेंबर

विदर्भ संग्राम समितीने आज (बुधवारी) पुकारलेल्या बंदला फारसा प्रतिसाद दिसून आलेला नाही. काही ठिकाणी दुकानं बंद आहेत पण तेवढा अपवाद वगळता बाजारपेठ मात्र सुरु आहेत. शहर वाहतूक बसेस आणि ऑटोरिक्षा सेवासुद्धा नेहमीप्रमाणे सुरु आहेत. संग्राम समितीचे नेते जांबुवंतराव धोटे यांनी ठिकठिकाणी जाऊन बंदचं आवाहन केलं पण त्यांच्या बंदच्या हाकेला लोकांनी साथ दिलेली दिसत नाही. धोटे आणि त्यांच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा आज नागपूरच्या लोकमत चौकात जाळला. जांबुवंतराव धोटे आणि जोगेंद्र कवाडे यांना पोलिसांनी अटक केली. शहिद चौकातून त्यांना कार्यकर्त्यांसह अटक करण्यात आली.

close