संसदेत सलग चौदाव्या दिवशी विरोधकांचा गोंधळ

December 1, 2010 12:56 PM0 commentsViews: 3

01 डिसेंबर

सलग चौदाव्या दिवशी संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आजही गदारोळातच सुरु झालं. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी संसदीय समितीमार्फत व्हावी या मागणीवर विरोधक ठाम आहेत. या गोंधळातच लोकसभेचं कामकाज पुढे नेण्याचा सरकारनं प्रयत्न केला. पण विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाज पूर्ण करणं अशक्य झालं आणि उद्यापर्यंत दोन्ही सभागृहांचं कामकाज स्थगित करण्यात आलं.

close