26/11 हल्ल्याशी संबंधित सातजणांना अटक

December 1, 2010 1:06 PM0 commentsViews:

01 डिसेंबर

स्पेनमध्ये बार्सिलोना इथं सात पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तर एका उत्तर आफ्रिकन नागरिकालाही अटक करण्यात आली. या सातही दहशतवाद्यांचा 26/11 हल्ल्याशी संबंध असल्याचं सांगण्यात येतं आहे. त्यांच्याकडून बनावट कागदपत्र जप्त करण्यात आली. तसेच पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी संघटनांशीही त्यांचा संबंध असल्याचं समजतंय. पण स्पेन सरकारकडून यासंदर्भात भारताशी अजून कोणताही संपर्क करण्यात आला नसल्याचं परराष्ट्र खात्याच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

close