सोनं महागलं प्रति तोळयाला 21 हजारांचा भाव

December 1, 2010 2:45 PM0 commentsViews: 5

01 डिसेंबर

सोन्याला पुन्हा नवी झळाळी मिळाली आहे. 10 ग्रॅम म्हणजेच एका तोळ्यासाठी सोन्याच्या दरानं 21 हजारांचा टप्पा गाठला आहे. तर चांदीनं किलोमागं 43 हजार 950 रुपयांचा टप्पा गाठला आहे. लग्नाच्या सिझनमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी वाढली. त्यामुळेच सोनं महागलं. गेल्या दिवाळीत सोन्यानं 20 हजारांचा दर गाठला होता.

close