आदर्शची फाईल नं 154 गेली कुठे ?

December 1, 2010 3:20 PM0 commentsViews: 10

01 डिसेंबर

आदर्श प्रकरणात आणखी एक नवीन खुलासा झाला. आदर्शची फाईल अचनाक कशी गायब होते आणि अचानक पुन्हा कशी येते या खुलासा नगर विकास खात्याच्या अधिकार्‍यांनीच केला. राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्तीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी अधिकार्‍यांशी फोनवर साधलेल्या संभाषणातून ही बाब उघडकीस आली आहे. आदर्शचा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली हेमंत पाटील यांनी अर्ज केला तेव्हा ती फाईल गायब असल्याची धक्कादायक माहिती त्यांना कळवण्यात आली. पण नंतर आदर्शमध्ये काय हेराफेरी करण्यात आली. ते उघड झालं. आणि या प्रकरणाची चौकशी सीबीआय क्राईम ब्रांचकडे देण्यात आली.आणि अचानक 27 नोव्हेंबरला मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. ही तक्रार होती.

फाईल नंबर 154 मधली चार पानं गहाळ झाल्याची. ही फाईल 11 नोव्हेंबरला कॅप्टन बत्रा यांनी 14 जून 2010 रोजी माहिती अधिकारामध्ये माहिती मागवली होती ? तेव्हा ही फाईल मिळत नव्हती. त्यानंतर ही फाईल शोधण्याचा प्रयत्न झाला. जेव्हा आदर्श घोटाळा बाहेर आला तेव्हा फाईल शोधण्यालसाठी जुना स्टाफ बोलवला गेला. आणि अचानक एक नोव्हेंबरला ही फाईल परत मिळाली. 2010. तेव्हा त्यातली चार पानं गायब होती. आणि तक्रार दाखल झाली.

आयबीएन लोकमतचे सवाल

फाईल नं. 154 गायब कशी झाली ?

ही फाईल हरवली की गायब करण्यात आली ?

कस्टोडियनच्या ताब्यात असलेल्या चाव्या कुणाकडे गेल्या ?

कस्टडीच्या चाव्या दुसर्‍या कुणीतरी का हाताळल्या ?

फाईल शोधण्यासाठी जुना स्टाफ का बोलवावा लागला ?

जुना स्टाफ बोलवण्याचे आदेश कुणी दिले ?

गायब झालेली फाईल परत कशी आली ?

डेस्क ऑफिसर वाजपेंची भूमिका काय ?

फाईल गायब करून पुन्हा तिथे आणण्यामध्ये हात कुणाचा ?

कोणत्या अधिकार्‍यांच्या आदेशावरून ही फाईल गायब करण्यात आली ?

फाईलमधली चार पानं कुणी फाडली ?

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची यात भूमिका काय ?

close