यंग ब्रिगेडच्या गंभीर खेळीचा विराट विजय

December 1, 2010 4:56 PM0 commentsViews: 1

01 डिसेंबर

कर्णधार गौतम गंभीरच्या शतकी खेळीने आणि विराट कोहलीच्या अर्ध शतकामुळे भारताने बुधवारी सवाई मानसिंह स्टेडियम मधील दूसर्‍या एकदिवशीय सामना जिंकला आहे. हा एकदिवशीय सामना जिंकत भारतानं सीरिजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली. न्युझीलंडनं जिंकण्यासाठी भारतासमोर 259 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं.

कर्णधार गौतम गंभीरने वन डे करियरमधली त्याची ही 10 वी सेंच्युरी आहे. विराट कोहलीने 73 बॉलमध्ये 64 रन्स केले.या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 116 रन्सची पार्टनरशिप केली.

close