नटसम्राटच्या भूमिकेत नाना पाटेकर दिसणार

December 1, 2010 5:10 PM0 commentsViews: 4

01 डिसेंबर

'कुणी घर देता का घर' हा प्रश्न अजरामर करणारी वि. वा .शिरवाडकरांची नाट्यकृती पुन्हा एकदा रसिकांसमोर येणार आहे.आता ही कलाकृती रंगमंचावर येणार नसून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नटसम्राट अप्पा बेलवलकरांच्या भूमिकेत अभिनेता नाना पाटेकर दिसणार आहे. अभिनेते श्रीराम लागू यांनी अजरामर केलेली अप्पा बेलवलकरांची भूमिका आता नाना पाटेकर आपल्या स्टाईलने मोठ्या पडद्यावर झळकवणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत महेश मांजरेकर. मांजरेकरांना नटसम्राट नाटकावर सिनेमा काढण्याची बर्‍याच वर्षापासून इच्छा होती. कारण रंगभूमीवर लोकप्रिय झालेली ही नाट्यकृती. मोठ्या पडद्यावरही तितकीच लोकप्रिय होईल असा विश्वास महेश मांजरेकरांना होता. या भूमिकेसाठी त्यांनी नाना पाटेकरांना विचारणा केली असता.नानांनी अप्पा बेलवलकरांच्या भूमिकेसाठी लगेच होकार दिला.या सिनेमाच्या पटकथेचे काम पूर्ण झालं की लगेच सिनेमाच्या शूटिंगला सुरवात होणार आहे.

close