शिवसेनेचे पाच आमदार निलंबित

December 2, 2010 9:57 AM0 commentsViews: 3

02 नोव्हेंबर

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गोंधळ घालणार्‍या शिवसेनेच्या पाच आमदारांना एक वर्षांसाठी निलंबित करण्यात आल आहे. संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी हा प्रस्ताव मांडलाआणि अखेर अभिजित अडसूळ, रविंद्र वायकर, आशिष जयस्वाल, संजय राठोड आणि शरद पाटील या शिवसेनेच्या पाच आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन झालं आहे. त्यानंतर विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान निलंबनाची कारवाई पूर्वनियोजित असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

close