राज ठाकरेंवर कारवाई करा – पंतप्रधानांची सूचना

October 31, 2008 1:05 PM0 commentsViews: 2

31 ऑक्टोबर, दिल्ली30 ऑक्टोबरच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज ठाकरेंच्या मुद्यावरून जोरदार खडाजंगी झाली. त्यात राज ठाकरेंवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांर्तगत कारवाई करा, अशी सूचना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विलासराव देशमुखांना पत्राद्वारे केली आहे. या बैठकीत रामविलास पासवान यांनी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र सरकारवर कारवाईची मागणी केली. दरम्यान राज ठाकरे आज मुंबईत अकरा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे.दरम्यान राज ठाकरेंच्या मुद्यावरून उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनीही महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली. ' विलासराव देशमुख सरकारनं पायउतार व्हावं. तसंच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी ' अशी मागणीही त्यांनी केली आहे.

close