काबरे बॅकेत 25 कोटींच्या अपहारप्रकरणी संस्थापकास अटक

December 2, 2010 11:12 AM0 commentsViews: 2

02 डिसेंबर

औगंगाबाद मध्ये तब्बल 25 कोटींच्या अपहारप्रकरणी एरंडोलच्या डॉ ना मो काबरे नागरी सहकारी बॅकेचे संस्थापक चेअरमन डॉ.ना.मो.काबरे यांना अटक करण्यात आली. काबरे गेल्या 3 महिन्यांपासून फरार होते.औरंगाबाद इथं काबरे यांच्यासह 14 संचालकांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांना आज एरंडोल कोर्टात हजर केलं जाणार आहे. एरंडोलच्या डॉ ना मो काबरे नागरी सहकारी बँकेनं ठेवीदारांना ठेवी देणं बंद केल्यानं सहकार खात्यानं या बँकेचं ऑडिट सनदी लेखापाल जयेश दोषी यांना दिलं होतं. सलग 2 वर्ष ऑडिट केल्यानंतर बँकेच्या संचालक मंडळानं 25 कोटीचा अपहार केल्याचं सिध्द झालं. सरकारच्यावतीनं दोशी यांनी गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून काबरे फरार होते. दरम्यान, काबरे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

close