नाशिकमध्ये आणखी एका द्राक्ष उत्पादकाची आत्महत्या

December 2, 2010 11:26 AM0 commentsViews: 30

02 डिसेंबर

अवकाळी पावसांनं राज्य भरात शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचा सर्वात जास्त फटका बसला तो विदर्भ आणि नाशिकला. नाशिक येथे पावसामुळे द्राक्ष बागांचं खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर नाशिकमध्ये आणखी एका द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याने आत्महत्या केली. येसगावचे शेतकरी विनोद शेलार यांनी आत्महत्या केली. शेलार यांच्यावर अडीच लाखांचे कर्ज आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळं त्यांचं मोठं नुकसान झालं होतं. गेल्या 10 दिवसांमधली द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याची ही चौथी आत्महत्या आहे.

close