सलग 15 व्या दिवशीही संसदेचं कामकाज ठप्प

December 2, 2010 11:58 AM0 commentsViews: 2

02 डिसेंबर

सलग 15 व्या दिवशीही जेपीसी चौकशीच्या मागणीवरुन संसदेचे कामकाज झालं नाही. विरोधकांच्या गदारोळातच रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी 45 हजार कोटी रुपयांचे रेल्वे पुरवणी मागणी विधेयक लोकसभेपुढे ठेवले. हे विधेयक आवाजी मतदानाद्वारे पारीतही करण्यात आले. कोणत्याही चर्चेशिवाय विधेयक मंजूर करण्यात आले. विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले. लोकसभेत सत्ताधार्‍यांनी 15 मिनीटं कामकाज रेटण्याचा प्रयत्न केला. पण विरोधकांनी गदारोळ कायम ठेवला.

close