कोयना अभयारण्याची सुप्रीम कोर्टाकडून गंभीर दखल

December 2, 2010 12:05 PM0 commentsViews: 9

02 डिसेंबर

कोयना अभयारण्यातील रस्ते, पवनचक्क्या आणि रिसॉर्ट अशा बेकायदा कामांची सुप्रीम कोर्टानंं गंभीर दखल घेतली. सामाजिक कार्यकर्ते नाना खामकर यांनी या बेकायदा कामांसंदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेची गंभीर दखल घेत सुप्रीम कोर्टाच्या अधिकार्‍यांनी पाटण तालुक्याचा दौरा केला. यावेळी गावकर्‍यांनी समितीच्या गाड्यांचा ताफाही अडवण्याचा प्रयत्न केला. कोयना चांदगाव अभयारण्यातले रस्ते आणि रिसॉर्टसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली. महेंद्र व्यास यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय कमिटी यासंदर्भातला अहवाल लवकरच सुप्रीम कोर्टापुढे ठेवणार आहे.

close