ठाण्यात पकडलेल्या अतिरेक्यांना 7 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

December 2, 2010 12:43 PM0 commentsViews: 1

02 डिसेंबर

ठाण्यात सोमवारी एटीएसने दोन अतिरेक्यांना अटक केली होती. या दोन अतिरेक्यांना 7 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल उडविण्याचा कट त्यामुळे उघडकीस आला. या अतिरेक्यांबाबत आणखी धक्कादायक माहिती पुढे आली. या अतिरेक्यांनी चार टार्गेट ठरवले होते आणि येत्या दोन महिन्यात आपली योजना पूर्ण नेण्याचा त्यांचा कट होता. मुंबईतल्या ऑईल रिफायनरी, मुंबई सेंट्रल, पुण्यातला मिल्ट्री कॅम्प आणि औरंगाबाद मधल्या छावणी भागतला मिल्ट्रीचा कॅम्प या चार महत्वाच्या ठिकाणांचा यात समावेश आहे.

close