गोव्यात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचा समारोप

December 2, 2010 4:59 PM0 commentsViews: 1

02 डिसेंबर

गोव्यातला 41 वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल ऑफ इंडिया अर्थात इफ्फीचा आज समारोप झाला. 10 दिवस चालणार्‍या या फेस्टीवलमध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली. यावेळेस अभिनेता सैफ अली खान, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री सी.एम.जटवा उपस्थित होते. यंदाच्या इफ्फी फिल्म फेस्टीवलमध्ये गौतम घोष दिग्दर्शित 'मोनेर मानूश' या बंगाली सिनेमाची सर्वाेत्कृष्ट फिल्म म्हणून निवड करण्यात आली. तसेच यंग जुरी अवॉर्ड 'आय ऍम कलाम' या फिल्मला मिळाला.

close