फिफा फुटबॉल वर्ल्ड कपच्या आयोजनाची सोडत जाहीर

December 2, 2010 6:06 PM0 commentsViews: 1

02 डिसेंबर

फिफा फुटबॉल वर्ल्ड कपच्या आयोजनाचा मान रशिया आणि कतार या देशांनी पटकावला आहे. 2018 आणि 2022 मध्ये होणार्‍या फिफा वर्ल्ड कपसाठी अनुक्रमे ही निवड करण्यात आली आहे. वर्ल्ड फुटबॉल फेडरेशन अर्थातच फिफाने झ्युरीचमध्ये झालेल्या सोडतीमध्ये याची अधिकृत घोषणा केली. 2018 चा वर्ल्ड कप रशियात होणार आहे. यासाठी इंग्लंड, स्पेन – पोर्तुगाल आणि नेदरलँड – बेल्जीयम हे देश प्रामुख्याने शर्यतीत होते. तर 2022 मधल्या आयोजनासाठी ऑस्ट्रेलिया, जपान ,कतार, दक्षिण कोरिया तसंच अमेरिका या देशांनी बोली लावली होती. पण अखेर यात कतारने बाजी मारली आहे. पुढचा 2014 मध्ये होणारा वर्ल्ड कप ब्राझीलमध्ये रंगणार आहे.

close