विरोधकांना चर्चा करण्याचं सरकारचं आवाहन

December 3, 2010 8:44 AM0 commentsViews: 1

03 डिसेंबर

शेतकर्‍यांच्या प्रश्नावर भाजप आणि शिवसेनेनं ताठर भूमिका घेतली असतानाच मनसे आणि शेकापनं मात्र चर्चेची तयारी दाखवली. विरोधकांनी चर्चा करावी असं आवाहन मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी केलं होतं. सरकार कुठल्याही चर्चेला तयार आहे. मात्र विरोधकांनी कामकाज बंद पाडू नये असंही मुख्यमंत्री म्हणाले. याबाबत अध्यक्षांनी गटनेत्यांची बैठक घेऊन भाजप शिवसेनेचे मन वळवण्याचा प्रयत्नही केला. भाजप आणि शिवसेनेनं त्याला प्रतिसाद दिला नाही.

close