विमानसेवेमध्ये मराठी भाषेच्या वापराला जेटची मान्यता

December 3, 2010 8:50 AM0 commentsViews: 2

03 डिसेंबर

जेट एअरवेजच्या विमानामधून आता मराठी अनाऊन्समेंट होणार आहे. विमानात मराठी वृत्तपत्रं मिळणार आहेत आणि मराठी चित्रपटही दाखवले जाणार आहेत. अशी माहिती मनसेचे आमदार नितीन सरदेसाई यांनी दिली. मुंबईतून जेट एअरवेजची सर्वाधिक विमानं उड्डाण करतात. पण जेट एअरवेजच्या विमानामध्ये हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषेची वृत्तपत्र मासिक, चित्रपट आणि विविध भाषेतल्या अनाऊंसमेंट होत होत्या. त्यात मराठीला स्थान नव्हतं. त्यामुळे मनसेने जेट एअरवेजच्या व्यवस्थापनाला पत्र लिहून मराठी भाषेचा वापरही विमानसेवेत करण्यात यावा अशी मागणी केली होती. त्याला जेटने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मनसेला पत्र लिहून जेट एअरवेजने मराठीचा वापर करु असं सांगितलं आहे .

close