मोदींना क्लीन चिट मिळण्याची शक्यता

December 3, 2010 12:00 PM0 commentsViews: 5

03 डिसेंबर

गुजरात दंगलीप्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता आहे. एस.आय.टी म्हणजेच विशेष तपास पथकाला मोदींचे या प्रकरणाशी संबंध असल्याचे कोणतेही थेट पुरावे सापडले नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबतचा स्टेटस रिपोर्ट एस.आय.टीनं गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टात सादर केला. 2002 च्या दंगलीत गुलबर्ग सोसायटीत काँग्रेसचे खासदार एहसान जाफरी यांची हत्या झाली होती. याप्रकरणी जाफरी यांच्या पत्नी झकिरा जाफरी यांनी मोदींवर आरोप केले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने विशेष तपास पथकाला तपासाचे आदेश दिले होते. मार्च 2010 मध्ये एस.आय.टीनं मोदींना समन्स बजावलं होतं. आणि त्यांची तब्बल 9 तास चौकशी केली होती.

close