नीरा राडीया टेप्सप्रकरणी आऊटलूकचा खुलासा

December 3, 2010 1:47 PM0 commentsViews: 6

03 डिसेंबर

नीरा राडीया टेप्स प्रकरण आऊटलुकने छापल्यानंतर गदारोळ झाला. यानंतर आज पहिल्यांदाचं आऊटलुकने आपलं मौन सोडलं. नवी दिल्लीत आज प्रेस क्लब ऑफ इंडियातर्फे एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. राडीया टेप आणि पत्रकरितेतले वाद याविषयावर या परिसंवादाचे आयोजन करण्यात आलं होत.सीएन एन आयबीएनचे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई आऊटलुकचे संपादक विनोद मेहता, फायनान्शिअल एक्सप्रेसचे पत्रकार सुनील जैन यावेळी उपस्थित होते.नीरा राडीया टेपप्रकरणी यावेळी आऊटलूकचे संपादक विनोद मेहता यांनी या टेपशी संबंधित सर्वच मुद्दयांवर खुलासेवार चर्चा केली. या टेपशी संबंधित पत्रकारांवर त्यांनी यावेळी टीका केली. खर्‍या खोट्यातला फरक ओळखण्यासाठी पत्रकारांनी आपलं कौशल्य वापरणं गरजेचे असल्याचे मत आऊटलुकचे संपादक विनोद मेहता यांनी व्यक्त केले.

close