आम्हीही अस्सल मुंबईकर – उत्तर भारतीयांचा दावा

October 31, 2008 3:49 PM0 commentsViews: 2

31 ऑक्टोबर, मुंबईउदय जाधवराज्यातील मराठी- अमराठी वाद. त्यातच उत्तर भारतीय नेत्यांची भडकाऊ भाषणबाजी यामुळं मुंबईतील उत्तर भारतीय अस्वस्थ आहेत. मुंबईतच लहानाचे मोठे झालेल्या या उत्तर भारतीयांना प्रश्न पडलाय की, आता जायचं कुठे ? त्यावरच आयबीएन लोकमतनं स्पेशल रिपोर्ट केला आहे. मुंबई आणि उपनगरात अनेक उत्तर भारतीय कुटुंबं जन्मापासून राहायला आहेत. भांडुपला राहणारे 35 वर्षांचे प्रेमचंद दुबे उत्तर भारतीय असले तरी, त्यांचा जन्म मुंबईतच झालेला आहे. यामुळे ते चांगलं मराठीही बोलातात. पण सध्या मनसेनं पेटवलेल्या वातावरणात, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला असुरक्षित वाटत आहे. मुंबईतील अनेक उत्तर भारतीयांच्या भावनाही दुबेंसारख्याच आहेत. कित्येक उत्तर भारतीय तर मुंबईत मनसे करत असलेल्या आंदोलनाला, इथेच जन्मलेले हे उत्तर भारतीय पाठिंबाही देतात. ' आमचा जन्मचं इथं झाल्यामुळे आमचाही मनसेला पाठिंबा आहे. त्यांच्या आंदोलनात त्यांनी आम्हालाही सामील करुन घ्यावं ' , असं दुबे यांचं म्हणणं आहे.मराठी भाषा आणि भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी मनसे सध्या जोरदार आंदोलन करत आहे. पण या आंदोलनात मुंबईतच जन्मलेला उत्तरभारतीय भरडला जातोय. त्यामुळे एकाच देशात राहणार्‍या नागरिकांची मनं मात्र दुभंगली जात आहेत. येत्या काही महिन्यात लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे महराष्ट्रातली मराठी वोट बँक मिळवण्यासाठी मनसे आपली सर्व ताकद पणाला लावणार, हे नक्की. पण या राजकीय खेळात सामान्य मुंबईकरांचं मात्र मोठं नुकसान होणार आहे.

close