जळगावात बहिणाबाईंचा स्मृतीदिन साजरा

December 3, 2010 1:53 PM0 commentsViews: 157

03 डिसेंबर

अरे संसार संसार , देतो सुखाले नकार आणि दु:खाला होकार..असं आपल्या कवितेतून म्हणणार्‍या बहिणाबाई चौधरी. आपल्या साध्या बोलीभाषेतल्या कवितेतून भल्यभल्यांना जीवनाचे तत्वज्ञान समजवणार्‍या या कवियित्रीच्या स्मृतीदिनानिमित्ताने जळगावच्या काव्यरत्नावली चौकात त्यांच्या आठवणी जागवण्यात आल्या. बहिणाबाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी आणि स्मिता चौधरी यांच्यासह बहिणाई ट्रस्टच्या विश्वस्त ज्योती जैन यावेळी उपस्थित होत्या.निसर्गकवी ना. धो. महानोर यांनी उपस्थित रसिकांशी संवाद साधतांना बहिणाईच्या कविताही सादर केल्या.

close