अशोक चव्हाण यांची हिवाळी अधिवेशनाला हजेरी

December 3, 2010 1:59 PM0 commentsViews: 12

03 डिसेंबर

आदर्शप्रकरणातून मुख्यमंत्रीपदावरुन पायऊतार झालेले अशोक चव्हाण हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावतील की नाही यावर तर्कवितर्क व्यक्त होत होते. मात्र चव्हाणांनी आज नागपुरात हजेरी लावली. आदर्श घोटाळ्यावर जेव्हा विधानसभेत चर्चा होईल तेव्हा सरकारची बाजू भक्कमपणे मांडली जावी यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना विधानसभेत उपस्थित राहण्यास कॉंग्रेसतर्फे सांगण्यात आल्याचं बोललं जातं आहे. त्यानुसार अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवसापासून अशोक चव्हाण विधानसभेत उपस्थित आहेत. त्यांना राज्यमंत्र्यांच्या बाजूचं 41 क्रमांकाचे आसन देण्यात आले आहे. आदर्श घोटाळ्याच्या चर्चेच्यावेळी अशोक चव्हाण काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

close