दोन शाही लग्नांची जोरदार चर्चा सुरू

December 3, 2010 8:10 AM0 commentsViews:

03 डिसेंबर

महाराष्ट्रात सध्या दोन शाही लग्नांची जोरदार चर्चा सुरू आहे. उद्योगमंत्री नारायण राणे आणि भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या मुलांच्या लग्नानिमित्त ही चर्चा सुरू झाली. राणेंच्या मुलांचा शाही लग्न सोहळा मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सवर झाला. तर काल नितीन गडकरींच्या मुलाचं लग्न झालं आणि आज नागपूरातल्या जामठा इथल्या मैदानावर नितीन गडकरींच्या मुलांचं रिसेप्शन होतं. याला देशाभरातले नेते आणि मोठे उद्योगपती हजेरी लावणार आहेत. साधेपणाची शिकवण सांगणार्‍या संघाचे स्वयंसेवक असणार्‍या गडकरींनी लग्नावर एवढा खर्च करावा का असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार स्वपन दास गुप्ता यांनी विचारला. त्यामुळे नेत्यांच्या मुलांची लग्न आणि त्यावरची उधळपट्टी यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

close