सुरेश कलमाडी पुण्यात दाखल

December 3, 2010 2:44 PM0 commentsViews: 4

03 डिसेंबर

कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्यामध्ये टिकेचे लक्ष्य झाल्यानंतर सुरेश कलमाडी ब-याच कालावधीनंतर पुण्यात दाखल झाले. पुण्यात 5 डिसेंबर रोजी होणा-या पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनच्या 25 वर्षाचा आढावा निमित्ताने भरवलेल्या आढावा प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी ते इथं आले होते. यावेळी त्यांना, तुमचा मूड कसाआहे? तुम्हाला टेंशन आहे का? असं विचारल्यानंतर आपण फ्रेश आहोत आणि मॅरेथॉननंतर कॉमनवेल्थ घोटाळ्यावर बोलू असं सांगत त्यांनी कॉमनवेल्थ प्रकरणाबाबत बोलण्यास नकार दिला. त्याचबरोबर पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि रविवारीही पुणेकर मोठ्या संख्येने या मॅरेथॉनसाठी बाहेर पडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

close