शिवसेनेच्या आमदारांचं निलंबन अधिवेशनापुरतचं ?

December 3, 2010 3:00 PM0 commentsViews: 1

03 डिसेंबर

शिवसेनेच्या पाच आमदारांचं निलंबन या अधिवेशनापूरतेच ठेवण्यात यावं अशी मागणी सेना भाजपच्या नेत्यांनी सत्ताधार्‍यांंकडे केली आहे. त्यावर नंतर विचार करू पण आधी विधिमंडळात चर्चा करू कामकाज होऊ द्या. अशी भूमिका सत्ताधार्‍यांनी घेतली. पण प्रत्यक्षात आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर सत्ताधार्‍यांनी विरोधकांशी तडजोड केली याला खुद्द विरोधी पक्षनेते आणि संसदीय कामकाज मंत्री यांच्याकडून दुजोरा मिळाला. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांचं निलंबन या अधिवेशनाच्या शेवटी मागे घेतलं जाईल, हे स्पष्ट झालं आहे.

close