लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर साठी सचिनला नामांकन

December 3, 2010 3:25 PM0 commentsViews: 1

03 डिसेंबर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं आता आणखी एका प्रतिष्ठीत पुरस्कारासाठी नामांकन झालं. लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2011 या पुरस्कारासाठी हे नामांकन आहे. क्रीडा क्षेत्रातला हा ऑस्कर पुरस्कार मानला जातो. या पुरस्कारासाठी सचिनला इतर क्रीडा प्रकारातल्या खेळाडूंची तगडी टक्कर असणार आहे. नंबर वन टेनिसपटू राफेल नदाल, फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी यासारखे खेळाडूनाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. त्याचबरोबर स्पिनचा जादुगर मुथ्थय्या मुरलीधरन, फॉर्म्युला वन चॅम्पियन सेबॅस्टीयन वेटेल, फुटबॉलपटू इनिएस्टा आणि दिएगो फोरलॅन हे खेळाडूही या यादीत आहेत.

close