नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात शेतकर्‍यांना भरघोस मोबदला

December 3, 2010 4:28 PM0 commentsViews: 25

03 डिसेंबर

नवी मुंबई एअरपोर्टला पर्यावरणानं हिरवा कंदिल दिल्यानं आता सिडकोनं उर्वरित जमिन ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. एअरपोर्टसाठी ताब्यात घेण्यात येणार्‍या शेतकर्‍यांच्या जमिनीच्या बदल्यात पहिल्यांदाच सिडकोनं शेतकर्‍यांच्या पदरात भरघोस मोबदला टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तीन हजार कुटुंबांचे पुनर्वसनही एका टाऊनशीप मध्ये करण्यात येणार आहे.

सिडकोला एअरपोर्टसाठी एकूण एकविशे हेक्टर जमिन लागणार आहे. या पैकी 78 टक्के जमिन सिडकोच्या मालकीची आहे. उर्वरित 22 टक्के जमिन सिडको ताब्यात घेणार आहे. तर 14 गावे स्थलांतरित करण्यात येणार आहेत. सिडको प्रत्येक शेतकर्‍याला जागेच्या बदल्यात साडेबारा टक्यांच भूखंड देणार आहे.

शेतकर्‍याच्या मूळ घराच्या क्षेत्रफळाच्या डबल क्षेत्रफळाचा भूखंड देण्यात येईल. गोठ्याच्याही बदल्यात तेवढीच जागा देण्यात येईल. शेतकर्‍यांच्या जुन्या घराची बाजार भावाप्रमाणे किंमत देवून अधिक दोन लाख रुपये घर बांधणीसाठी देण्यात येणार आहे. छोट्या घरांना किमान 500 फूटांचं भूखंड देण्यात येणार आहे. विमानतळावर उपलब्ध होणार्‍या नोकरीत शेतकर्‍यांना प्राधान्य दिलं जाणार आहे.

शेतकर्‍यांच्या तीन हजार कुटुंबासाठी उभारण्यात येणारी टाऊनशीप ही वहाळ, वरघड, दापोली या गावांजवळ तयार करण्यात येणार आहे. या टाऊनशीप मध्ये शाळा, सांस्कृतीक केंद्र उभारली जाणार आहे. घरे तयार होई पर्यंत शेतकर्‍यांना एक रकमी दोन वर्षाचं किमान वेतन दिला जाणार आहे.

शेतकर्‍यांच्या वाट्याला

1. जागेच्या बदल्यात साडेबारा टक्यांचा भूखंड 2. घराच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट भूखंड 3. गोठ्याच्याही बदल्यात तेवढीच जागा 4. जुन्या घराला बाजारभावाप्रमाणे किंमत आणि 2 लाख रुपये 5. छोट्या घरांच्या बदल्यात 500 स्क्वे.फूटांचा भूखंड6. शेतकर्‍यांना नोकरीत प्राधान्य

नवी मुंबई विमानतळ गावाची होणार टाऊनशिप

1. 3000 कुटुंबासाठी टाऊनशिप वहाळ, वरघड, दापोली 2. शाळा, सांस्कृतिक केंदं्र उभारणार3. घरं मिळेपर्यंत दोन वर्षांचं एकरकमी किमान वेतन

close