अमेरिकन एक्सप्रेस आणि क्रायस्लरचा कामगारकपातीचा निर्णय

October 31, 2008 4:21 PM0 commentsViews: 4

31 ऑक्टोबर, बंगळुरूमंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कंपन्यांनी आता नाईलाजानं कर्मचारी कपात सुरु केली आहे. अमेरिकन एक्सप्रेस बँकेनंही 10 टक्के कर्मचारी कमी करण्याचा विचार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कंपनीचे सुमारे 180 कोटी वाचणार तर आहेत पण 7 हजार कर्मचार्‍यांना घरी बसावं लागणार आहे. अमेरिकन एक्सप्रेसला तिसर्‍या तिमाहीत 24 टक्के तोटा झाल्यामुळे कंपनी आता उच्चस्तरीय अधिकार्‍यांचं वेतनही कमी करण्यात येणार आहे तसंच काही काळ नवीन भरतीही थांबवण्यात येणार आहे. कंपनीच्या भारतातल्या ब्रँचेसमधूनही कर्मचारी कमी करण्यात येतील, अशी शक्यता आहे. मात्र त्यांची संख्या अद्याप समजू शकलेली नाही. दरम्यान अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनी क्रायस्लरचीही परिस्थिती हीच आहे. कंपनीची विक्री गेल्या 9 महिन्यात 25 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे ही कंपनीदेखील 25 टक्के कर्मचार्‍यांना कमी करणार आहे. सध्या त्यांच्याकडे साडेअठरा हजार उच्चस्तरीय अधिकारी आहेत, ज्यापैकी सुमारे 5 हजार जणांची नोकरी जाण्याचा संभव आहे.

close