‘आयडियाची कल्पना’ चित्रपटाचं पाच सुहासिनींच्या हस्ते म्युझिक लॉन्च

December 3, 2010 4:36 PM0 commentsViews: 4

03 डिसेंबर

मराठी सिनेमात सध्या विषय, त्याचं सादरीकरणाबद्दल नवनवे प्रयोग होत आहेत. आता पहिल्यांदाच अभिनेते सचिन पिळगांवकर, अशोक सराफ आणि महेश कोठारे हे त्रिकुट सिनेमातनं एकत्र पहायला मिळणारे आहे.आयडियाची कल्पना असं या नव्या मराठी सिनेमाचं नाव असून या सिनेमाचं दिग्दर्शनही सचिन यांचं आहे. नुकतंच या सिनेमाचं म्युझिक लॉन्च झालं. महाराष्ट्रीयन परंपरेनूसार पाच सुहासिनींच्या हस्ते हे म्युझिक लॉन्च केलं गेलं. विशेष म्हणजे सिनेमाचं संगीत जरी अवधूत गुप्ते यांचं असलं तरी यातली दोन गाणीही स्वतः सचिनजींनी संगीतबद्ध केली शिवाय यातल्या गाण्यांना त्यांनी आपला आवाजही दिला. हा सिनेमा येत्या 31 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो.

close