शाही लग्नाचा थाट पण विमान वाहतूकीची वाट

December 3, 2010 5:30 PM0 commentsViews: 6

03 डिसेंबर

भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या मुलाच्या लग्नाचा आज स्वागत समारंभ आहे. हा शाही सोहळा नागपूरच्या व्ही.सी.ए.स्टेडियमवर रंगला आहे. या समारंभाला लाखो लोक आले. आणि यात व्हीआयपी, व्हीव्हीआयपी यांच्या नावांची लांबलचक यादी आहे. या सोहळ्यासाठी आलेल्या विमानांसाठी नागपूर एअरपोर्टवर खास पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. पण त्यामुळे काही विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग खोळंबलं आहे.

22 विशेष विमानांमधून व्हीव्हीआयपी नागपुरात दाखल झाले. सात राज्यांचे मुख्यमंत्री, शंभरहून अधिक मंत्री, सातशेहून अधिक आमदार, तर अडीचशेहून अधिक खासदार, स्वागत समारंभासाठी उपस्थित आहेत. उद्योगपती आणि बॉलिवूड सेलिब्रेटींचीही यात हजेरी आहे. बंदोबस्तासाठी 700 जवान तैनात करण्यात आले. या स्वागत समारंभासाठी दीड लाख लग्नपत्रिका छापण्यात आल्या होत्या.

close