‘विकीलीक्स’ चा संस्थापक ऍसांजवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल

December 3, 2010 5:33 PM0 commentsViews: 6

03 डिसेंबर

अमेरिकेच्या जगभरातल्या राजकारणाशी संबंधित हजारो गोपनीय कागदपत्रं प्रसिद्ध करून विकिलिक्स या वेबसाईटनं खळबळ उडवून दिली. आणि त्यामुळे अमेरिका सरकार अडचणीत आलं आहे. या वेवसाईटचा संस्थापक ज्युलियन ऍसांजला आता अडकवण्याचे अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत. ज्युलियन ऍसांजवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्या संदर्भात त्याला स्वीडनच्या सुप्रीम कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले गेले आहेत. सध्या वादात असलेली विकी लीक्स ही वेबसाईट डोमेन नेम प्रोव्हाइडरने आपली सर्व्हिस रद्द केल्यामुळे काही काळ बंद होती. पण थोड्याच वेळात एक स्विसडोमेननेम वापरून विकीलीक्स पुन्हा सुरू झाली.

close