मुख्य दक्षता आयुक्त थॉमस राजीनामा देण्याची शक्यता

December 3, 2010 5:39 PM0 commentsViews: 5

03 डिसेंबर

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या कचाट्यात सापडलेल्या सरकारनं आता डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू केले. अनेक आरोप असलेले मुख्य दक्षता आयुक्त पी. जे. थॉमस अखेर राजीनामा देण्याची शक्यता आहे. थॉमस यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली. 2 जी घोटाळा आणि केरळमधल्या पामोलिन तेल आयात प्रकरणात थॉमस यांच्यावर आरोप आहेत. त्यामुळे ते 2 जी घोटाळ्याची चौकशी कशी करू शकतात असा प्रश्न सुप्रीम कोर्टानं विचारला होता. त्यांच्यावर कोर्टाने ताशेरे ओढूनही सरकार त्यांना हटवायला सरकार टाळाटाळ करत होतं.

दरम्यान, 2 जी घोटाळ्याच्या मुद्द्यावरून आज सलग 16 व्या दिवशी संसदेत गदारोळ झाला. पण घटनात्मक पेच टाळण्यासाठी या गोंधळातच सरकारने काही मदत्त्वाची कामं आजही रेटून नेली. घोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करावी, या मागणीवर विरोधक ठाम आहेत. दोन्ही सभागृहांंचं कामकाज आज दोनवेळा तहकूब झालं. पण मोठ्या गदारोळातच सराकरनं काही विधेयक सादर केली. रेल्वे अप्रोप्रिएशन विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात आलं. कालही सरकारनं काही विधेयक मांडली होती.

close