महापौरांनी अनधिकृतपणे पाणी कनेक्शन दिले – नितेश राणे

December 3, 2010 5:55 PM0 commentsViews: 3

03 डिसेंबर

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर श्रद्धा जाधव यांच्या नवर्‍याच्या मनोहर डेकोटरेटर या कंपनीला अनधिकृतपणे पाणी कनेक्शन देण्यात आल्याचा आरोप नितेश राणे यांनी एका कार्यक्रमादरम्यान केला. तसेच हे पाणी कनेक्शन 48 तासांच्या आत तोडण्यात आलं नाही तर स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते ते पाणी कनेक्शन तोडतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

स्वाभिमान संघटनेने गेल्या वर्षी महानगरपालिकेवर काढलेया मोर्चात झालेल्या लाठीमारा दरम्यान एका विरल ढोलकीया या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

close