शेतकर्‍यांसाठी एक हजार कोटींचं पॅकेज जाहीर

December 4, 2010 9:09 AM0 commentsViews: 1

04 डिसेंबर

अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. हेक्टरी 20 हजारांची मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. त्याचप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची वीज तोडणार नसल्याचं आश्वासनंही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. तसेच द्राक्ष बागायतदारांच्या कर्जाची पुर्णरचना करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. अवकाळी पावसामुळे राज्यातल्या 5 लाख 44 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 12 डिसेंबरपर्यंत शेतीचे पंचनामे पूर्ण करण्यात येतील. विरोधकांनी मात्र या पॅकेजवर नाराजी व्यक्त केली. पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.

close